सलून चालकांना सुरक्षा किट देत आ.रोहित पवारांनी केलं ट्रिमिंग

 

मतदारसंघात सलून चालकांना सुरक्षा किट देत आ.रोहित पवारांनी केलं ट्रिमिंगनगर: सरकारने सलून सुरू करण्यास परवानगी दिल्याने आ.रोहित पवार यांनी कर्जत जामखेड मतदारसंघातील सर्व सलून चालकांना त्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा किट देण्यास सुरुवात केली आहे. आज आ.पवार खर्डा इथंल्या सलूनमधील कारागिरांना सुरक्षा किट दिलं असता, यावेळी अनेक दिवसांनी विठ्ठल थोरात यांच्या सलूनमध्ये ट्रिमिंग केलं.आता कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने आपल्याला अधिक जागरूक रहावं लागेल. या पार्श्वभूमीवर सर्वच सलूनमधील कारागिरांनी स्वतःसह ग्राहकांच्याही आरोग्यासंदर्भात योग्य खबरदारी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post