शरद पवारांच्या ड्रॉव्हरमधून 54 आमदारांची यादी चोरून राज्यपालांना देणं नैतिक आहे का? चंद्रकांत पाटील यांचा अजितदादांना बोचरा सवाल

 

शरद पवारांच्या ड्रॉव्हरमधून 54 आमदारांची यादी चोरून राज्यपालांना देणं नैतिक आहे का? चंद्रकांत पाटील यांचा अजितदादांना बोचरा सवाल



पुणे: उपमुख्यमंत्रीअजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील शाब्दिक चकमक सध्या राज्यात गाजत आहे. 

चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना अजित पवारांवर निशाणा साधला. राष्ट्रवादीच्या 54 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना सादर करण्याचा विषय 14 महिने जुना आहे, हा विषय आता का काढता? असा सवाल अजित पवार यांनी केला होता. त्याविषयी चंद्रकांतदादांना छेडण्यात आले. त्यावर त्यांनी अजित पवारांवर तोंडसुख घेतलं. महाराष्ट्र झोपेत असताना एक दिवस राज्यातील सरकार पडेल, असे आपण म्हटल्यावर अजित पवार यांनी काही बोलण्याची आवश्यकता नव्हती. कारण मी काही त्यांना उद्देशून बोललो नव्हतो. परंतु, त्यांनी त्यावर आपली चेष्टा करण्याचा प्रयत्न केला. आता तुम्ही बोलला तर मला बोलावे लागणार. कारण वाराला प्रतिवार करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे आपल्याला शिकवले आहे, असं सांगतानाच 14 महिने झाले तरी जे चुकीचे ते चुकीचेच असते. शरद पवारांच्या ड्रॉव्हरमधून 54 आमदारांची यादी चोरून राज्यपालांना सादर करणे कोणत्या नैतिकतेत बसते? तरीही ते शहाणपणा शिकवतात?, असा सवाल पाटील यांनी केला

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post