सुमारे दोन कोटींचा अपहार, पतसंस्थेच्या २ संचालकांना अटक

सुमारे दोन कोटींचा अपहार, पतसंस्थेच्या २ संचालकांना अटक नगर: सोनई येथील व्यकंटेश पतसंस्थेमध्ये चार वर्षापूर्वी झालेल्या एक कोटी 93 लाखांच्या अपहार प्रकरणी नगरच्या आर्थिक गुन्हा शाखेच्या पथकाने दोन संचालकांस अटक केली आहे. या कारवाईनंतर इतर संचालकांत घबराट पसरली आहे.

सन 2016-17 मध्ये सोनई  येथील व्यकंटेश पतसंस्थेमध्ये चार वर्षापूर्वी झालेल्या एक कोटी 93 लाखांच्या अपहार प्रकरणी नगरच्या आर्थिक गुन्हा शाखेच्या पथकाने दोन संचालकांस अटक केली आहे. या कारवाईनंतर इतर संचालकांत घबराट पसरली आहे.


सन 2016-17 मध्ये सोनई येथील व्यकंटेश पतसंस्थेत सामुदायिक कटकारस्थान रचून व पदाचा दुरुपयोग करत संस्थेची फसवणूक करुन एक कोटी 93 लाख 7 हजार 406 रुपयाचा अपहार झाला होता. याप्रकरणी त्यावेळेस कर्मचारी शामसुंदर शंकर खामकर, गणेश हरिभाऊ गोरे, गणेश अंबादास तांदळे आदींना अटक करण्यात आली होती. यातील दोन कर्मचारी काही रक्कम भरुन जामिनावर सुटले मात्र एक आरोपी अजूनही जेलची हवा खात आहे.


नगरच्या आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण व पथकाने संचालक तेजकुमार हिरालाल गुंदेचा व गोपाल रुपचंद कडेल या दोघांस अटक केली आहे. सोनई पोलीस ठाण्यात सुविधा सुविजय सोमाणी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 11/2018,भारतीय दंड विधान कलम 406, 409, 420, 467, 468, 471, 120(ब) नुसार गुन्हा दाखल आहे.ल व्यकंटेश पतसंस्थेत सामुदायिक कटकारस्थान रचून व पदाचा दुरुपयोग करत संस्थेची फसवणूक करुन एक कोटी 93 लाख 7 हजार 406 रुपयाचा अपहार झाला होता. याप्रकरणी त्यावेळेस कर्मचारी शामसुंदर शंकर खामकर, गणेश हरिभाऊ गोरे, गणेश अंबादास तांदळे आदींना अटक करण्यात आली होती. यातील दोन कर्मचारी काही रक्कम भरुन जामिनावर सुटले मात्र एक आरोपी अजूनही जेलची हवा खात आहे.

नगरच्या आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण व पथकाने संचालक तेजकुमार हिरालाल गुंदेचा व गोपाल रुपचंद कडेल या दोघांस अटक केली आहे. सोनई पोलीस ठाण्यात सुविधा सुविजय सोमाणी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 11/2018,भारतीय दंड विधान कलम 406, 409, 420, 467, 468, 471, 120(ब) नुसार गुन्हा दाखल आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post