५ गावांनी करोनाला वेशीवरच रोखले तर ४४६ गावं करोनामुक्त

 ५ गावांनी करोनाला वेशीवरच रोखले तर ४४६ गावं करोनामुक्तनगर: जिल्ह्यात करोनाच्या दुसर्‍या लाटेत हाहाकार सुरू असतांना पाच गावांनी करोनाला गावात प्रवेश मिळून दिलाच नाही. तर दुसरीकडे करोनाचा गावात शिरकाव झाल्यानंतर त्याचा यशस्वी मुकाबला केल्यानंतर 446 गावांनी करोनावर मात केली असल्याची माहिती जिल्हा परिषद आरोग्य ग्रामपंचायत विभागाच्यावतीने देण्यात आली.

जिल्ह्यात करोनामुळे आतापर्यंत 3 हजार 571 मृत्यू झालेले असून 2 लाख 69 हजार 562 जणांना करोनाची बाधा झाली होती. यातील 2 लाख 60 हजार 910 जणांनी करोनावर मात केलेली असून बुधवारअखेर 5 हजार 51 करोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात साधारणपणे दोन महिन्यांपूर्वी करोना उद्रेक वाढल्यानंतर राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊन लावत निर्बंध आणले.

यासह दिवसाला बाधितांच्या संपर्कात येणारे, माझे कुटूंब माझी जबाबदारी अभियानात दररोज 20 हजारांहून लोकांची करोनाची चाचणी केली. यामुळे शेवटच्या करोना रुग्णापर्यंत पोहता आले आणि त्यांचे विलगीकरण करण्यातआल्याचा दावा जिल्हा प्रशासनाचा आहे. याचा परिपाक म्हणून गत आठवड्याअखेर जिल्ह्यात 446 गावातून करोनाला रद्दपार करण्यात यश आले आहे.

या 446 गावांच्या ग्रामपंचायतींची संख्या 364 असून अनेक ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत अस्तित्वात असल्याने करोनामुक्त गाव आणि ग्रामपंचायतींच्या संख्येत तफावत दिसत आहे. यासह जिल्ह्यात पाच गावात करोनचा शिरकाव झालेला नाहीत. यातील चार ग्रामपंचायती या कोपरगाव तालुक्यातील तर एक ग्रामपंचायत नेवासा तालुक्यातील आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post