श्रीरामपूरच्या ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌नगराध्यक्षांचा भाजप पदाधिकार्याविरोधात ५ कोटींचा दावा

 श्रीरामपूरच्या ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌नगराध्यक्षांचा भाजप पदाधिकार्याविरोधात ५ कोटींचा दावा, समाजात अपप्रचार व बदनामी केल्याची तक्रारनगर : छत्रपती शिवाजी महाराजांचा  पुतळा बसवण्यावरून अपप्रचार करुन आपली बदनामी केली म्हणून श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी भाजपाचे प्रकाश चित्ते यांच्यावर ५ कोटी रुपयाचा नुकसान भरपाईचा दावा श्रीरामपूर येथील सिव्हील कोर्टात दाखल केला आहे. त्यामुळे तालुक्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काल प्रकाश चित्ते यांना या दाव्यासंदर्भात नोटीस प्राप्त झाली.


नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी चित्ते यांच्या विरोधात न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी चौक सोडून इतरत्र बसविण्याबाबत भूमिका घेतली असल्याचा अपप्रचार करुन आदिक यांची बदनामी करण्याच्या हेतुने तशा आशयाचे हॅण्डबिल छापून त्यामध्ये जाणून बुजून आदिकांची बदनामी करता यावी म्हणून आदिकांच्या नावाचा उल्लेख करुन 'नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा शिवाजी चौक सोडून दुसरीकडे बेकायदेशीरपणे बसविण्याच्या घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात व शिवजयंतीच्या दिवशी शिवाजी अचानक प्रशासनाने चौकात स्थापन केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नगरपालिका हटविल्याच्या निषेधार्थ रविवार दि. ४ एप्रिल २०२१ रोजी श्रीरामपूर बंद, आपले नम्र- श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळा संघर्ष समिती, शिवाजी चौक, श्रीरामपूर' अशा आशयाचा धादांत खोटा मजकूर टाकून तो संपूर्ण शहरामध्ये सदर हॅण्डबिलचे स्वतः वाटप केले व आदिकांबद्दल अपप्रचार करुन त्यांची बदनामी केली असल्याचे दाव्यात म्हटले आहे.


. चित्ते यांनी चुकीच्या बातम्या व गैरसमज पसरवत जाणून बुजून द्वेषभावनेने माझी बदनामी केल्याचे नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी या दाव्यात म्हटले आहे.चित्ते यांना   श्रीरामपूर येथील दिवाणी न्यायालयात १४ जून रोजी हजर राहण्याची   नोटीस न्यायालयाने  काढली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post