राज्याला दीड कोटी डोस मिळणार होते पण केंद्राने 'सिरम'ला धमकावले

 

राज्याला दीड कोटी डोस मिळणार होते पण केंद्राने सिरमला धमकावले 

राज्य‌ सरकारच्या लसीकरण प्रमाणपत्रावर ठाकरे, पवार, थोरात यांचे फोटो

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहितीनगर: अहमदनगर येथील शिवराज्यभिषेक दिनाच्या कार्यक्रमानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूटकडून जून महिन्यामध्ये दीड हजार कोटी डोस उपलब्ध करून देण्याचे कबूल केले होते. परंतु केंद्र सरकारने सिरम इन्स्टिट्यूटला धमकी दिली आणि त्यामुळे हे डोस राज्याला मिळू शकलेले नाहीत. एकीकडे राज्य सरकारला डोस घ्यायला सांगायचं आणि दुसरीकडे कंपन्यांना धमक्या द्यायचा हे योग्य नाही.

अठराच्या १८ वर्षे वयोगटातील पुढील नागरिकांना राज्याने आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना केंद्र सरकारने अशा पद्धतीने लसीकरणाची नियोजन योग्य नाही. संपूर्ण देशासाठी लसीकरणाबाबत एकच धोरण असावे, याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार लवकरच पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी भारतासाठी डोस उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. याच बायडन यांच्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचार केला होता. असे असतानादेखील अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारतासाठी २५ हजार कोटी रुपये किमतीचे डोस उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवली. त्यांचं किती मोठं मन आहे हे यावरून दिसून आलं. ममता बॅनर्जी यांनी १८ पेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना डोस देताना त्यांचे फोटो त्या लसीवर लावला. देशांमध्ये नेमकं काय चाललंय हे काही कळत नाही. ४५ वरील वयोगट नागरिकांच्या लसी प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदी यांचा फोटो तर १८ पेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांच्या लसी प्रमाणपत्रावर ममता बॅनर्जी यांचा फोटो आहे. असे असेल तर आम्हीही १८ वर्षे वयोगटावरील नागरिकांना डोसा देताना या लस प्रमाणपत्रावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे फोटो लावू, असेही यावेळी हसन मुश्रीफ म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post