'तोपर्यंत' राज्यात निवडणुका होऊ देणार नाही.... माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌स्पष्ट इशारा

 राज्यात निवडणुका होऊ देणार नाही.... माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌स्पष्ट इशारामु्ंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा निर्वाणीचा इशारा दिलाय. ओबीसींची इम्पिरिकल डेटा तयार केल्याशिवाय राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असा पुनरुच्चार पंकजा मुंडे यांनी केलाय. तसंच येत्या 26 जूनला राज्यभरात भाजपकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा पंकजा मुंडे यांनी केलीय. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारला इशारा देण्यात आलाय. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post