राष्ट्रवादीत मोठं इनकमिंग, माजी केंद्रीय मंत्र्याने बांधलं घड्याळ

 माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते राष्ट्रवादीत दाखलपुणे : माजी केंद्रीय मंत्री आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सुबोध मोहिते यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. शरद पवार यांच्या उपस्थितीत सुबोध मोहिते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे. मोहिते यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात अवजड उद्योग खात्याचे मंत्री म्हणून कामकाज पाहिलं आहे. शिवसेनेत असताना त्यांनी नारायण राणे यांच्यासोबत पक्षाला रामराम ठोकला होता. मोहिते यांनी शिवसेना, भाजप, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस असा राजकीय प्रवास केलाय.

सुबोध मोहिते हे पहिल्यांना शिवसेनेकडून रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून लोकसभेवर गेले होते. मात्र, त्यानंतर ते रामटेक लोकसभा मतदारसंघातून निवडून येऊ शकले नाहीत. पुढे त्यांनी विधानसभा निवडणूकही लढवली पण तिथेही त्यांना यश मिळालं नाही. त्यानंतर बराच काळापासून सुबोध मोहिते हे राजकारणापासून अलिप्त होते. त्यानंतर आज अखेर सुबोध मोहिते यांनी पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post