मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी बाळासाहेब पवार यांची बिनविरोध निवड

मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी बाळासाहेब पवार यांची बिनविरोध निवड

सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी कटिबद्ध- नूतन चेअरमन बाळासाहेब पवारअहमदनगर प्रतिनिधी- अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी बाळासाहेब पवार यांची बिनविरोध निवड झाली असून सूचक म्हणून संचालक जितेंद्र सारसर व बाळासाहेब गंगेकर यांनी अनुमोदन दिले तसेच निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही.के. मुटकुळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली.यावेळी मा.चेरमन बाबासाहेब मुदगल, व्हा.चेअरमन.विकास गीते,संचालक श्रीधर देशपांडे,किशोर कानडे,सतिष ताठे,अजय कांबळे,संचालिका चंद्रकला आढाव व कार्यलक्षी आनंद तिवारी आदी उपस्थित होते.
        मा.चेअरमन बाबासाहेब मुदगल म्हणले की, सर्वांच्या सहकार्यामुळेच सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्यात आली आहे. पतसंस्था ही मनपा कर्मचाऱ्यांची कामधेनू आहे. गेल्या साडेतीन वर्षांमध्ये सभासदांचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावले आहे, पुढील काळामध्ये पतसंस्था स्वभांडवली होण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत कोरोनाच्या काळामध्ये दुर्दैवी मृत्युमुखी पडणाऱ्या सभासदांच्या नातेवाईकांना सर्वात प्रथम आर्थिक मदत करण्याचे काम केले आहे याचबरोबर सभासदांच्या मुलांच्या शिक्षणाचा,लग्न समारंभासाठी व आरोग्याच्या हितासाठी आदीसह विविध निर्णय घेण्यात आले आहे. यापुढील काळात पतसंस्था कामकाजातून नावलौकिक मिळेल असे ते म्हणाले.
       नूतन चेअरमन बाळासाहेब पवार म्हणाले की,सर्व संचालक मंडळाच्या व सभासदांच्या सहकार्यामुळेच चेअरमन पदाची संधी मिळाली आहे. सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले जातील,सभासदांची शंभर वर्षांची परंपरा असलेली पतसंस्था आहे या पतसंस्थेला लवकरच स्वभांडवली करण्यासाठी उपाय योजना सुरू आहे. सभासदांच्या अडीअडचणीच्या काळात पतसंस्था नेहमीच सभासदांच्या मागे खंबीरपणे उभी राहिली आहे. सभासदांच्या हिताचे निर्णय राबवण्यासाठी आम्ही सर्व संचालक मंडळ कटिबद्ध आहोत असे ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post