आ.संग्राम जगताप यांनी घेतली ज्येष्ठ नेते शरद पवार, खा.सुप्रिया सुळे यांची भेट

 आ.संग्राम जगताप यांनी घेतली ज्येष्ठ नेते शरद पवार, खा.सुप्रिया सुळे यांची भेट, नगरच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांकडे लक्ष‌ वेधलेनगर:  आमदार संग्राम‌ जगताप यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार  यांच्या निवासस्थानी भेट घेऊन नगर शहरातील कोरोनाच्या प्रदूर्भातील अनुषंगाने आरोग्य सुविधा व त्यांची उपलब्धता बाबत माहिती दिली. तसेच अहमदनगर जिल्ह्यात मागील काळात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढ झाल्याने उपचारासाठी अहमदनगर तालुक्यातील रुग्ण नगर शहरात येत असल्याने शहरातील आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण आल्याने अनेक रुग्णांना बेड उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण झाल्या, त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा व्हेंटिलेटरची कमतरता इत्यादी बाबी प्रकर्षाने जाणवल्या होत्या.तज्ज्ञांच्या मते जुलै व ऑगस्ट महिन्यात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे,या काळात मोठ्या प्रमाणात लहान मुले बाधित होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनामार्फत अद्यावत मुबलक प्रमानात सर्व सोयी सुविधायुक्त ऑक्सिजन कोविड सेंटर तालुका स्तरावर उभारण्याबाबत आपण शासनास सूचित करावे अशी विनंती केली. आणि शासनाकडून जास्तीत जास्त प्रमाणात  लसी उपलब्ध करून देण्याबाबत मागणी केली.तसेच आ.‌जगताप यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन  अमृत योजने अंतर्गत सावेडी भुयार गटार योजना मंजूर करण्याबाबत केंद्र स्तरावर मदत करण्याबाबत मागणी केली.

तसेच उच्चतंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत  यांना भेटून अहमदनगर शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने या ठिकाणी शासकीय अभियांत्रिकी पदवी महाविद्यालय मंजुर करण्याबाबत मागणी केली.

यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी खासदार  सुप्रियाताई सुळे,उच्चतंत्र शिक्षणमंत्री उदयजी सामंत , आमदार सतीश चव्हाण ,युवती महिला प्रदेशअध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य कु.सक्षणा सलगर,यांच्याशी महामारीवर चर्चा केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post