आ.संग्राम जगताप यांना मंत्रिपद मिळणार ? नगरमध्ये झाला ठराव

 आ.संग्राम जगताप यांना मंत्रिपद मिळणार? नगरमध्ये झाला ठरावनगर : अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागल्यामुळे राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक मंत्रिपद रिकामं झालं आहे. त्या ठिकाणी नगरचे आ.संग्राम जगताप यांची वर्णी लावण्यात यावी अशी मागणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी तसा ठरावही मांडण्यात आलाय. या ठरावात आमदार संग्राम जगताप यांनी मंत्रिपदाची संधी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. 

राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी एक ठराव मांडण्यात आला. त्यात संग्राम जगताप यांची मंत्रिपदी वर्णी लावावी अशी मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब जगताप म्हणाले कि, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करत असताना 4 विधानसभा सदस्यामागे 1 मंत्रीपद असा फॉर्म्युला तयार करण्यात आला होता. मात्र, अहमदनगर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 6 विधानसभा सदस्य असूनही प्राजक्त तनपुरे यांना राज्यमंत्री पद मिळाले. हा अहमदनगर जिल्ह्यावर झालेला राजकीय अन्याय आहे. त्यामुळे जगताप यांना मंत्री पद देण्याची मागणी होऊ लागली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post