चक्क कोविड रुग्णांच्या साक्षीने मंगलाष्टके, कोविड सेंटरमध्ये पार पडला विवाह


आ.लंके यांच्या कोविड सेंटरमध्ये पार पडला उच्च शिक्षित जोडप्यांचा विवाहनगर: भाळवणी येथील शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर हे सध्या महाराष्ट्रात नव्हे तर देशासह विदेशातही चर्चेचा विषय ठरले आहे.. आमदार नीलेश लंके यांनी सुरु केलेल्या कोविड सेंटरमध्ये आमदार लंके पूर्णवेळ रुग्णसेवा करत असतात. त्यांच्या या सामाजिक कार्यावर प्रेरित होऊन शासनाने ठरवून दिलेल्या अटी व नियमांचे पालन करत सोमवारी शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिरात दोन उच्चशिक्षित जोडप्यांचा विवाह सोहळा आमदार नीलेश लंके व शेकडो कोरोना रुग्णांच्या उपस्थितीत पार पडला.


कोरोना रुग्ण हे आपले बांधव नातेवाईकच आहेत. परंतु या आजारामुळे समाजात त्यांच्याकडे तिरस्काराने पाहिले जाते. आमदार लंके या रुग्णांना आपले कुटुंब समजून पूर्णवेळ त्यांची सेवा करतात. आपणही समाजाचे काही तरी देणे लागतो या सामाजिक भावनेतून कोरोना रुग्णांबद्दलची समाजात असणारी भीती कमी करण्यासाठी मूळचे पारनेरचे रहिवासी असणारे व नोकरी व्यवसायाच्यानिमित्ताने ठाणे शहरात वास्तव्यास असणारे सखाराम बापु व्यवहारे यांचे चिरंजीव अनिकेत व नगर येथील कन्या चि.सौ.कां. आरती नानाभाऊ शिंदे तसेच रावसाहेब शंकर काळे (ता. नगर) यांची कन्या चि.सौ.कां. राजश्री व जनार्दन पुंजाजी कदम (ता. नेवासा) येथील उच्चशिक्षित तरुणांनी आपल्या नवीन वैवाहिक जीवनाची सुरुवात करण्यासाठी पवार आरोग्य मंदिर येथे आ. नीलेश लंके यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी व कोरोनाबाधित रुग्णांच्या शुभेच्छा व आशीर्वाद घेण्यासाठी आरोग्य मंदिरात विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला. शेकडो  कोरोनाबाधित रुग्ण, आ. नीलेश लंके व प्रतिष्ठान तसेच सहकारी मित्रांच्या प्रमुख उपस्थितीत पवार आरोग्य मंदिरात हा विवाह सोहळा पार पडला.यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, बाळासाहेब खिलारी, राजेंद्र चौधरी, अशोक घूले, श्रीकांत चौरे, डॉ.सुनिल गंधे, बंडू कुलकर्णी, दत्ता कोरडे, प्रमोद गोडसे, संदीप भागवत, संदीप चौधरी, सत्यम निमसे, देवराम व्यवहारे आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post