पतीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, महिलेने दुसर्या महिलेला भररस्त्यात धुतले


पतीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, महिलेने दुसर्या महिलेला भररस्त्यात धुतलेनगर:  पती सोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय घेत एका महिलेने दुसर्‍या महिलेला मारहाण केली. नगर- कल्याण रोडवरील सिना नदीच्या पुलाजवळ शनिवारी रात्री 10 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.

मारहाण झालेल्या महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी शनिवारी रात्री नगर- कल्याण रोडवरून त्यांच्या आईच्या घरी जात होत्या. सिना नदीच्या पुलाजवळ समोर आलेल्या एका महिलेने फिर्यादी यांना पती सोबत असलेल्या प्रेम संबंधावरून शिवीगाळ, दमदाटी करून हातातील वस्तूने मारहाण केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस नाईक गणेश चौधरी करीत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post