महिला सरपंच व ग्रामसेविका यांच्यात फ्री स्टाईल हाणामारी

 

महिला सरपंच व महिला ग्रामसेवक यांच्यात फ्री स्टाईल मारहाणभंडारा  : भंडारा जिल्ह्यातील सिलेगावमध्ये ग्राम पंचायतीच्या महिला सरपंच आणि महिला ग्रामसेवक यांच्यात फ्री स्टाईल मारहाण झाल्याचं समोर आलं आहे. या  मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


आज शिवस्वराज्य दिन असल्याने तुमसर तालुक्यातील सिलेगाव ग्राम पंचायत येथे कार्यक्रम घेण्यात आला. त्यांनतर थोड्याच वेळात घरकुल ठरावाच्या प्रोसेंडिंग यावरून वाद झाला. महिला सरपंच संध्या पारधी यांनी ग्रामसेवक मंजुषा शहारे यांच्या जावळील प्रोसिडिंग घेऊन जात असताना ग्रामसेवक व इतर सदस्यांनी सरपंच यांना अडवण्याचा प्रयत्नही केला. तेवढ्यातच धक्काबुकी झाली आणि त्याचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले. महिला सरपंच, सदस्यांनी ग्रामसेवकांना मारहाण केली.  ही फ्री स्टाईल मारहाण काही ग्रामस्थांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद करत व्हायरल केली आहे. या व्हिडीओत महिला सरपंच आणि ग्रामसेवक एकमेकींना मारहाण करताना दिसत आहे. या प्रकरणी सिहोरा पोलिसात परस्पर विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस याचा तपास करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post