सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे, हे तपासण्याची सोपी ट्रिक

 सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे, हे तपासण्याची सोपी ट्रिकस्वयंपाकघरातील एलपीजी सिलिंडर संपणं ही सर्वसामान्य बाब आहे. अशावेळी दुसरा सिलेंडर बॅकअप असल्यास कोणतीही समस्या येत नाही. पण, एकच सिलेंडर असेल किंवा दुसरा खाली असेल, तर अशावेळी मोठी समस्या येते. परंतु एका ट्रिकद्वारे सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे, हे जाणून घेता येऊ शकतं.

तुमच्या सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वात आधी एक कपडा पाण्यात भिजवून ओला करुन घ्या. या ओल्या कपड्याने सिलेंडरवर एक मोठी रेष ओढा. त्यानंतर 10 मिनिटं वाट पाहा.

आता तुमच्या सिलेंडरचा जो भाग खाली झाला आहे, तिथे पाणी लवकर सुकेल आणि जिथपर्यंत गॅस भरलेला असेल, तिथे पाणी उशिरा सुकेल. सिलेंडरचा रिकामा भाग गरम असतो, त्यामुळे रिकाम्या भागात पाणी लवकर सुकतं. आणि गॅस भरलेला भाग थंड असतो, त्यामुळे तिथे पाणी उशिरा सुकतं.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post