ग्रामपंचायत सदस्य होण्याची परिस्थिती नसताना मी लोकांमुळे आमदार झालो


ग्रामपंचायत सदस्य होण्याची परिस्थिती नसताना मी लोकांमुळे आमदार झालो : आ.लंके पाथर्डी:ग्रामपंचायत सदस्य होण्याची परिस्थिती नसतांना प्रस्थापितांच्या विरोधात मी आमदार होतोय एवढेच पुष्कळ आहे.लोकांनी स्वतःच्या पैश्यातून लोक वर्गणी करून निवडून आणले.आता कोरोना रूपाने समाज्यातील लोकांवर वेळ आली असून ते ऋण फेडण्याची वेळ आहे.त्यामुळे कोविड सेंटरमध्ये अहोरात्र काम करत आहे.समाजातील लोकांसाठी असे काम करा पुढेच वीस पंचवीस वर्ष लोक नाव घेतील असा काम करून दाखवा असे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी केले. पाथर्डी येथील गोरे मंगल कार्यालयात सतीश मासाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर,आरोग्य शिबीर, वृक्षारोपण,गरजूंना किराणा वाटप व कोरोना योद्धांचा सन्मान आदी सामाजिक उपक्रम आयोजित कार्यक्रम प्रसंगी आमदार लंके बोलत होते.याकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे तालुकाउपाध्यक्ष गोकुळ दौंड हे होते. तर प्रमुखमान्यवर म्हणून  


तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री, टायगर ग्रुपचे अध्यक्ष तान्हाजी जाधव,भाजपा युवामोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल गर्जे,माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड,सतीश मासाळकर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गहिनीनाथ शिरसाट, नगरसेवक बंडू बोरुडे,राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सिताराम बोरुडे,रफिक शेख,एकनाथ आटकर,रणजित बेळगे, अर्जुन धायताडक,मनसे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ,अविनाश पालवे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ भगवान दराडे,कैलास गाडेलकर आदी उपस्थिती होते.पुढे बोलतांना लंके म्हणाले,शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरात आजपर्यंत ८ हजार कोरोना रुग्ण पूर्णपणे स्वस्थ झाले असून प्रत्येक कोरोना रुगांसाठी सकारात्मकतेने उपचार पद्धती मानसिक आधार दिल्याने कोरोना रुग्ण बरे झाले आहेत.कोरोना आजारात  ८० टक्के रुग्ण हे भीतीने मृत्यू झाले आहे.तरुणांनी सामाजिक उपक्रम हाती घेऊन वाढदिवसाचे सोहळे आयोजित करावे.पुढच्या जन्मावर माझा विश्वास नाही याच जन्मात असे काही काम समाजासाठी करा कि येणारी पिढीने तुमचे नाव काढले पाहिजे.पाथर्डी तालुक्याची भूमी पवित्र असून हे माझे माहेर घर आहे.आमदार करण्यात पाथर्डीचा मोठा वाटा आहे.येथील माझ्याकडे येणारा माणूस माझ्यासाठी प्रेमाचा आहे.ह्या तालुक्याने माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. हे विसरू शकत नाही. मागच्या जन्मी माझ्या जन्म पाथर्डी तालुक्यातच झाला आहे असे हि लंके म्हणाले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल राठोड तर सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी करून आभार मानले.वसंत कुसळकर,भगवान मासाळकर,संजय मोहिते,विशाल अतकरे ,काळू मासाळकर ,वैभव पवार, आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. 0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post