घरात घुसून ३० वर्षीय तरूणाचा खून


घरात घुसून ३० वर्षीय तरूणाचा खून, अकोले तालुक्यातील घटना नगर: अवैधरित्या दारू विक्री करणार्‍या लोकांनी घरात घुसून एका 30 वर्षीय तरुणाचा खून केल्याची घटना अकोले तालुक्यातील खडकी बु. येथे रविवारी रात्री घडली. वाळू भगवंता बांडे (वय 30, रा. खडकी, ता. अकोले) असे या घटनेत खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.


दरम्यान खडकी ग्रामस्थ संतप्त होऊन खून करणार्‍या दारू विक्रेत्यांना तातडीने अटक करावी. खडकी बुद्रुक गावात अवैध विक्री होणार नाही, असे पोलीस प्रशासनाने लेखी दिल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही. असे मृताचे नातेवाईक व ग्रामस्थांनी मागणी करून श्री दत्त मंदिरात उपोषण सुरू केले होते. त्याच वेळी काही ग्रामस्थांनी राजूर पोलीस स्टेशनला येऊन संगमनेर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन लेखी मागणी करून आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली. यावेळी सरपंच श्रावण भांगरे, गणपत भांगरे, नामदेव भांगरे, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते .


संगमनेर उपविभागीय अधिकारी राहुल मदने तसेच राजूर पोलीस स्टेशनचे सपोनि नरेंद्र साबले यांनी लेखी हमी दिल्यावरून सोमवारी दुपारी दोन वाजता ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेतला तर बिट हवालदार यांची बदली दुसर्‍या बीटला करण्यात आल्याने उपोषणही थांबविण्यात आले.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post