केडगावला जुगार अड्ड्यावर छापा, ८० हजारांचा मुद्देमाल जप्त

 

केडगावला जुगार अड्ड्यावर छापा, ८० हजारांचा मुद्देमाल जप्तनगर: अपर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या विशेष पथकाने केडगाव शिवारातील ठुबे वस्ती येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी सात जुगारी पोलिसांच्या हाती लागले. त्यांना तब्यात घेत रोख रक्कम, मोबाईल, जुगाराचे साहित्य असा 80 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस शिपाई आकाश चव्हाण यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मच्छिंद्र भानुदास चौभे (रा. वाकोडी ता. नगर), राकेश पांडुरंग आंबड (रा. सांधोळा ता. केज जि. बीड), सुधीर डॅनियल शिंदे (रा. कोठी, स्टेशन रोड, नगर), गणेश रामदास पवार (रा. तपोवन रोड, नगर), अरविंद लख रावत, अजय मदन रावत, बिरदर गिरीजा सिंग (तिघे रा. बिहार) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस निरीक्षक ए. के. माने, सहायक फौजदार शिवाजी ढवळे, पोलीस शिपाई जाधव, गव्हाणे, गोरे, आकाश चव्हाण यांच्या पथकाने शनिवारी दुपारी ही कारवाई केली.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post