करोनाचा धोका... आणखी एका तालुक्यात स्वयंस्फूर्तीने निर्बंध व जनता कर्फ्यु

 करोनाचा धोका... कर्जतमध्ये स्वयंस्फूर्तीने निर्बंध व जनता कर्फ्युकर्जत  - करोनाच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांच्या आवाहनास प्रतिसाद देत कर्जत व्यापारी असोसिएशनने आज बैठक घेऊन शहरातील दुकानांची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच 30 जूनपर्यंत दर शनिवारी जनता कर्फ्यू पाळला जाणार असल्याने या दिवशी शहरातील बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व नगरपंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांना देण्यात आले. यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अर्जून भोज, उपाध्यक्ष प्रसाद शहा, खजिनदार संजय काकडे, सचिव बिभीषण खोसे, विजय तोरडमल, अभय बोरा, संतोष भंडारी, राजेंद्र बोरा, मिलिंद बागल, अभिषेक बोरा यांच्यासह व्यापारी उपस्थित होते

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post