निर्बंध उठताच लग्न समारंभ केला, वधूवरासह २५ जणांना करोनाची बाधा

 निर्बंध उठताच लग्न समारंभ केला, वधूवरासह २५ जणांना करोनाची बाधानगर: अहमदनगर जिल्हा करोना संसर्गाच्या दृष्टीने पहिल्या लेव्हलला आहे. त्यामुळे बहुतांश निर्बंध उठविण्यात आले आहेत.  विवाह संमारंभालाही १०० जणांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्याचे काही दुष्परिणामही आता समोर येऊ लागले आहेत. राहुरी तालुक्यातील कणगर येथील एका विवाह सभारंभात वधू-वरांसह तब्बल २५ जणांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नवविवाहितांना थेट कोविड केअर सेंटरमध्येच दाखल होण्याची वेळ आली.

लग्नासाठी मोठ्या संख्येने नातेवाई आलेले असल्याने सर्वांच्याच मनात शंका आली. सरपंच सर्जेराव घाडगे यांनी करोनामुक्त गाव मोहीम लक्षात घेऊन यासाठी पुढाकार घेतला. प्रशासनाच्या मदतीने दोन्ही ठिकाणच्या वऱ्हाडी मंडळींच्या वस्त्यांवर रॅपीड अँटीजेन टेस्टचे शिबीर घेतले. लग्न समारंभाला हजेरी लावलेल्या सर्वांची चाचणी करण्यात आली. एक एक करता तब्बल २५ जणांना बाधा झाल्याचे आढळून आले. सुदैवाने सर्वांना सौम्य लक्षणे आढळून आली. त्यामुळे सर्वांना राहुरी कृषी विद्यापीठाच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post