मायलेकीला मारहाण करत जबरी चोरी, नगर तालुक्यातील घटना

 मायलेकीला मारहाण करत जबरी चोरी, नगर तालुक्यातील घटनानगर - माय-लेकीला मारहाण करून चोरट्यांनी घरातील रोख रक्कम, सोन्याचे दागिणे व मोबाईल असा 59 हजारांचा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेला. तालुक्यातील कामरगाव शिवारात सोमवारी पहाटे ही घटना घडली.

या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. शुभांगी विजय जाधव (वय 21 रा. कामरगाव ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांच्या आई घरामध्ये झोपलेल्या असताना पहाटे चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून फिर्यादी व त्यांच्या आईकडे असलेले सोन्याचे दागिणे, रोख रक्कम, मोबाईल बळजबरीने काढून घेत पोबारा केला.

घटनेची माहिती तालुका पोलिसांना मिळताच पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, सहायक निरीक्षक राजेंद्र सानप यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राऊत करीत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post