सारोळाकासारचे सरपंचपद... कडूस यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा

 सारोळा कासारच्या सरपंचपदी आरती रविंद्र कडूस कायम  नगर : नगर तालुक्यातील सारोळा कासार गावच्या सरपंच पदी आरती रवींद्र कडूस कायम राहणार असून विभागीय आयुक्तांनी कडूस यांचे सरपंच पद रद्द केलं होतं. मात्र उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने विभागीय आयुक्तांच्या या निर्णयास स्थगिती देत सरपंचपदी आरती कडूस याच कामकाज पाहतील असे स्पष्ट केले आहे. याप्रकरणी न्यायालयात सुनावणी चालूच राहणार आहे. विभागीय आयुक्तांच्या निर्णयाला कडूस यांच्यावतीने न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. यात सुनावणी सुरू असताना न्यायालयाने कडूस यांना दिलासा दिला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post