सावेडी उपनगरात घरफोड्या, हजारोंचा ऐवज लंपास


सावेडी उपनगरात २ घरफोड्या, हजारोंचा ऐवज लंपासनगर:  करोना लॉकडाऊनमुळे दोन- अडीच महिन्यांपासून तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत कमी झालेल्या चोर्‍या, घरफोड्यांनी डोके वर काढले आहे. 

तपोवन रोडवरील ढवणवस्तीवर बिरोबा मंदिराजवळ असलेल्या निता सुनील आव्हाड यांचे बंद घर फोडून सात हजारांची रोख रक्कम, दीड हजार रूपयांचे घड्याळ व सोन्याचे दागिने असा 24 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. आव्हाड यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.

घरफोडीची दुसरी घटना पाईपलाईन रोडवरील पवननगरमध्ये घडली. अविनाश श्रीकांत गोफणे यांच्या घराच्या टेरेसवरील दरवाजाची कडी उघडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. पाकिटामध्ये ठेवलेली पाच हजारांची रक्कम, गोफणे यांच्या आईच्या गळ्यातील सोन्याची पोत असा 30 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post