लग्न लागताच नवर्याने धरले पत्नीचे पाय...कारण ऐकून व्हाल थक्क


लग्न लागलं... आणि नवरा लगेचच पत्नीसमोर झाला नतमस्तक मुंबई :  सध्या सोशल मीडियावर एक नवरदेव फार चर्चेचा विषय ठरतो आहे, जो हे सगळं काही मोडीत काढून समाजासमोर एक नवा आदर्श मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. 

त्याने लग्न झाल्यानंतर भर मंडपात आपल्या बायकोचे थेट पाय धरले आहेत. हा प्रसंग लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांनी कॅमेऱ्यात कैद केला आहे. या घटनेचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. भर मंडपात आपल्या बायकोचे पाय धरणाऱ्या या नवऱ्या मुलाचे तोंडभरून कौतूक केले जात आहे.

सध्या व्हायरल होत असलेला फोटो हा नेमका कुठला आहे याची निश्चित माहिती मिळू शकलेली नाही.  मात्र, सध्या व्हायरल होत असलेला हृदयस्पर्षी फोटो डॉ. अजित वरवांडकर यांनी शेअर केला आहे. तसेच सलग चार ट्विट करत या फोटोबाबत त्यांनी अधिक माहिती दिली आहे.

नवरदेवाने आपल्या बायकोचे पाय का धरले असे त्याला सगळीकडे विचारण्यात येत आहे. त्यानंतर त्याने खालील उत्तरं दिली आहेत.

ती माझा वंश पुढे चालवणार आहे.

ती माझ्या घराची लक्ष्मी आहे.

ती माझ्या आई-वडिलांचा सम्नान करेल. तसेच त्यांची काळजी घेईल

मला वडील होण्याचं सुख देणार आहे.
प्रसूतीवेळी मृत्यूच्या दाढेतून परत येणार आहे.

तिच्याच व्यवहारामुळे मी समाजात ओळखला जाणार आहे.

ती तिच्या आई-वडिलांना सोडून माझ्याकडे आली आहे.

हे सगळं जर ती माझ्यासाठी करत असेल, तर आपण तिला थोडा सन्मानसुद्धा देऊ शकत नाही का ? महिलांच्या पायासमोर डोकं झुकवणे जर हास्यास्पद असेल तर मला त्याची चिंता नाही, असे या नवऱ्या मुलाने म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post