ग्रामसेवक संवर्गाच्या विविध प्रश्नांवर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी सविस्तर चर्चा, 'या' विषयांची सोडवणूक लवकरच


ग्रामसेवक संवर्गाच्या विविध प्रश्नांवर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी सविस्तर चर्चानगर: महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डीएनई 136 च्या प्रतिनिधी मंडळाने आज मंत्रालयात ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सोबत ग्रामसेवक संवर्गाच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली. यात युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे, माजी अध्यक्ष लहानु गायकवाड,उपाध्यक्ष सुचित घरत, सरचिटणीस  प्रशांत जामोदे, कोषाध्यक्ष संजिव निकम, राज्य समन्वयक उदयराज शेळके, बापु अहिरे सहभागी झाले होते.


ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी हे पद रद्द करुन पंचायत अधिकारी पद निर्माण करण्याच्या मागणीबाबत उच्चस्तरीय समिती नेमुन सहा महिन्यांत अहवाल प्राप्त झालेवर सदर विषयावर निर्णय घेणेत येईल. शैक्षणिक अर्हता पदवीधर करणेबाबत  विधी व न्याय विभागाकडून अभिप्राय मागवुन  एक महिन्यात निर्णय घेणेत येईल. ग्रामविकास सोडुन इतर विभागाची अतिरिक्त कामे कमी करणेबाबत  चर्चा होवून मित्रगोत्री साहेब, संचालक राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान यांचे अध्यक्षतेखाली  समिती गठीत केली असुन तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ४९  नुसार  उदा कृषी समिती सचिव बाबत ज्या ज्या विभागानुसार त्या त्या खातेतील सचिव राहतील. याबाबत येत्या विधानसभा अधिवेशनात बदल करणेत येईल  व तसेच, फळबाग लागवड बाबत मा.मंत्री यांनी सदर विषय हा कृषी खातेचा आहे. सत्तार साहेबांनी सदर अहवाल तात्काळ  राज्य कृषी यंत्रणा कडे पत्रव्यवहार करणेस आदेश देणेत आले. फळबाग लागवड विषयी मंत्री सत्तार यांनी मी तुमच्या बरोबर असे ठणकावून सांगितले.

एक पंचायत एक ग्रामसेवक  या विषयावर मंत्री सत्तार यांनी सदर विषयाबाबत मान्यता दिली . याबाबत लवकरच निर्णय घेणेत येईल. 

कोरोनाने मृत्यू झालेल्या ग्रामसेवकांचे कुटुबांना विमा कवच रु.५० लाख निधी देणेबाबत चर्चा करुन लवकरच आदेश पारित करणेत येतील, असे मंत्री सत्तार यांनी सांगितले. वैद्यकीय बिलाबाबत क्लेम सुविधा उपलब्ध करणेबाबत प्रस्ताव सादर करणेत यावा असे ठरले.तसेच रू.१५००  कायम प्रवास भत्ता आदेशातील जाचक अटिबाबत  चर्चा करणेत आली आसता सदर प्रस्ताव स़घटना कडुन सादर करणेस सांगणेत आले.
0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post