नगर जिल्ह्यात 'या' कारणासाठी शेतकऱ्यांच्या रांगा

ऊसाची नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांचा रांगा नगर: श्रीगोंदा तालुक्यातील सहकार महर्षी स्व.शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याकडे चालू हंगामात ऊसाची नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांनी रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली असून काही शेतकरी तर पहाटे पासून रांगेत उभे होते. या ऊसाची नोंद घेण्यासाठी कारखान्याची यंत्रणा असली तरी आलेले शेतकऱ्यांची कुठली सोय कारखाना प्रशासनाने केलेली दिसत नाही.सध्या करोनाचा काळ असला तरी शेतकऱ्यांना उसाच्या नोंदी कारखान्याला देणे आवश्यक आहे. ऑनलाइन नोंदची सोय आहे मात्र त्यात शेतकऱ्यांना अडचणी येत असल्याने प्रत्यक्षात तालुक्यातील शेतकरी कारखाना स्थळावर आल्याने गर्दी झाली असल्याचे सांगितले जात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post