मुख्यमंत्रीपदाबाबत अजित पवार यांचे मोठं वक्तव्य...

 

मुख्यमंत्रीपदाबाबत अजित पवार यांचे मोठं वक्तव्य...पुणे: महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्रिपदावरून चर्चा सुरू आहे. 5 वर्ष मुख्यमंत्रिपद आपल्याकडेच राहणार असं शिवसेनेनं स्पष्ट केले आहे तर काँग्रेसनेही त्याला सहमती दर्शवली आहे. पण, 'सध्यातरी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार चालवायचं ठरलं आहे. नाना पटोले यांनी त्यांची भूमिका व्यक्त केली आहे', असं सूचक विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना अजित पवार यांनी यांनी कोरोना परिस्थिती, वारी आणि महाविकास आघाडीतील मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेवर आपले मत व्यक्त केले.

'प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र जरी आलो असलो तरी पक्ष वाढवण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. सोनिया गांधी, उद्धव ठाकरे, आणि शरद पवार साहेबांनी एकत्र येत हे सरकार स्थापन केलं आहे, त्यामुळे त्यांनीच याबद्दल निर्णय घेतला आहे, असं म्हणत अजित पवार यांनी नाना पटोले यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेला टोला लगावला.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post