बारावीच्या विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या

 

बारावीच्या विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्याश्रीरामपूर  - श्रीरामपूर शहरात बारावीच्या विद्यार्थिनीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. श्रीरामपूर शहरात वॉर्ड नं. 3, संगमनेर रोड, गजानन वसाहत कॉलनी भागात राहणार्‍या कल्याणी संतोष नाईक (वय 18) या विद्यार्थिनी अभ्यास करत असलेल्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

या घटनेप्रकरणी विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी श्रीरामपूर शहर पोलिसांत खबर दिल्यावरून आकस्मात मृत्यू नं. 57 नोंदविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी घटनास्थळी भेट दिली. कल्याणी या विद्यार्थिनीने नेमकी कोणत्या कारणाने गळफास घेऊन आत्महत्या केली याचे कारण कळू शकले नाही. पुढील तपास हे.कॉ. काळे करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post