खा.संभाजीराजे छत्रपतींची कोपर्डीला भेट... केली महत्त्वपूर्ण मागणी

 

खा.संभाजीराजे छत्रपतींची कोपर्डीला भेटनगर: खा. संभाजीराजे छत्रपती यांनी आज नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील भगिनीच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केले. तसेच ताईच्या कुटूंबीयांचीही भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातील सर्व मराठा समन्वयक उपस्थित होते. २०१६ साली साली कोपर्डीच्या भगिनीवर अत्याचार झाला. २०१७ साली आरोपींवरील गुन्हे सिद्ध होऊन त्यांना फाशीची शिक्षा झाली.त्यानंतर आरोपींनी शिक्षेविरूद्ध उच्च न्यायालयात अपील केले, तेव्हापासून हा विषय प्रलंबित आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने तात्काळ याविषयी उच्च न्यायालयात 'स्पेशल बेंच'च्या स्थापनेची मागणी करून हा विषय सहा महिन्यांच्या आत निकाली लावावा, अशी मागणी त्यांनी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post