राज्यात राष्ट्रवादीलाही अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद....खा.संजय राऊत म्हणाले...

 

राज्यात राष्ट्रवादीलाही अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद....खा.संजय राऊत म्हणाले...नाशिक: आघाडीत मुख्यमंत्रीपदावरुन संभ्रम निर्माण झाला आहे का? अशी चर्चा आता पुन्हा जोर धरु लागली आहे. त्याला कारण आहे. संजय राऊतांचं सामनातलं रोखठोक सदर आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा नाशकात दिलेलं स्पष्टीकरण. राष्ट्रवादीला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद हवं आहे आणि तसं ठरल्याची राज्यात जोरदार चर्चा आहे. पण ,असं काहीच ठरलेलं नसून आघाडी सरकारचं मुख्यमंत्रीपद पाच वर्ष शिवसेनेकडेच राहणार असं रोखठोकपणे संजय राऊत सांगत आहेत. 

नाशिक येथे एका बैठकीनंतर  शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यात एका पत्रकारानं प्रश्न विचारला की, आघाडीत सत्तेचा फिफ्टी फिफ्टी फॉर्म्युला ठरलेला आहे का? त्यावेळेस संबंधित पत्रकाराला करेक्ट करत राऊत म्हणाले की, ‘मी रोखठोकमध्ये सत्तेच्या फॉर्म्युल्याबद्दल लिहीलेलं नाही. तर या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री पूर्ण पाच वर्ष राहील. यामध्ये कुठल्याही वाटाघाटी नाहीत. ही कमिटमेंट आहे असं मी म्हटलं आहे. कारण आतापर्यंत पूर्वीच्या सरकारमध्ये काही वाटे ठरलेले होते. तसा इथे मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही वाटा नाही. पूर्णकाळ राज्याचं मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे राहील. अशा प्रकारची कमिटमेंट सुरुवातीपासून झालेली आहे. आणि मला असं वाटतं, माननीय शरद पवार साहेबांनी सुद्धा जाहिरपणे हेच वक्तव्य केलेलं आहे’.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post