रेखा जरे खून प्रकरण...बोठे विरोधात दोषारोपपत्र दाखल होणार

 

रेखा जरे खून प्रकरण...बोठे विरोधात दोषारोपपत्रनगर: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील पुरवणी दोषारोप पत्र पारनेर न्यायालयात दाखल केले जाणार असल्याची माहिती तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी दिली. सुमोर 300 पानांचे हे पुरवणी दोषारोपपत्र असून यामध्ये मुख्य आरोपी बाळ बोठेसह त्याला मदत करणार्‍या अन्य सहा जणांविरूद्ध दोषरोप ठेवण्यात आले आहे.

रेखा जरे यांची 30 नोव्हेंबरला पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात हत्या झाली. या हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी सुरूवातीला पाच आरोपींना अटक केली होती. अटक केलेल्या आरोपींकडून हत्याकांडामागे मुख्य सूत्रधार बाळ बोठे असल्याची माहिती समोर आली. हत्या झाल्यानंतर बोठे पसार झाला होता. यामुळे सुरूवातीला पोलिसांनी अटक केलेल्या पाच आरोपीविरूद्ध पारनेरच्या न्यायालयात 720 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले होते. बोठे याला 102 दिवसानंतर पोलिसांनी हैदराबाद मधून अटक केली.

या अटकेला येत्या 10 जून रोजी 90 दिवस पूर्ण होत आहे. त्यापूर्वी न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल करणे बंधनकारक आहे. बोठेला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे तपास केला. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post