'एक हसीना थी' भोवले, मनपा वैद्यकीय अधिकार्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले

 

'एक हसीना थी, एक दिवाणा था' भोवले, मनपा वैद्यकीय अधिकार्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलेनगर: महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना आज (बुधवार) पासून आयुक्त शंकर गोरे यांनी सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. त्यांचा अतिरिक्त पदभार डॉ. सतीश राजूरकर यांच्याकडे देण्यात आला आहे. डॉ. बोरगे मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणास्तव चर्चेत होते. त्यातून ही कारवाई झाल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

काही दिवसांपूर्वी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवत डॉ. बोरगे यांनी दालनात वाढदिवस साजरा केला होता. या वाढदिवसाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणी आयुक्त गोरे यांनी डॉ. बोरगे यांना नोटीस बजावली होती. डॉ. बोरगे यांच्यावरील कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश आयुक्त गोरे यांनी सामान्य प्रशासनाला दिले होते.

दरम्यान काही दिवसांपूर्वी डॉ. बोरगे यांच्या दालनात एका कर्मचाऱ्याने रेमडेसिवीर इंजेक्शन आणले होते. या प्रकरणी पोलिसांकडून बोरगे यांची चौकशी करण्यात आली होती. कोविड काळात वादग्रस्त ठरलेले डॉ. बोरगे यांना आयुक्त गोरे यांनी सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post