बियाणे घेताना सतर्क रहा...नगर जिल्ह्यात सहा लाखांचे बोगस बियाणे जप्त

 

बियाणे घेताना सतर्क रहा...नगर जिल्ह्यात सहा लाखांचे बोगस बियाणे जप्तनगर ः कृषी विभागातर्फे नेमण्यात आलेल्या गुणनियंत्रण पथकाच्या निरीक्षकांनी सुमारे सहा लाखांचे बोगस वाटाणा बियाणे पारनेर शहरात पकडले. या प्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कान्हूर पठार परिसर हा वाटाण्याचे आगार म्हणून ओळखला जातो. याशिवाय पारनेर तालुक्यात अनेक गावांतील शेतकरी आता वाटाणा पीक घेत आहेत. त्याचा गैरफायदा गेल्या काही वर्षांपासून वाटाणा बियाणेविक्री करणारे व्यापारी घेत आहेत. खरीप हंगामातील बियाणांचा होणारा काळाबाजार, तसेच बोगस बियाणे विक्रीस आळा बसावा, यासाठी गुणनियंत्रण पथकाची नियुक्ती केली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, हा त्यामागचा उद्देश आहे. या पथकाची जिल्हा कृषी विभागातर्फे गुणनियंत्रकांची (बियाणे निरीक्षक) नेमणूक केली आहे. या पथकात कृषी अधीक्षक कार्यालयातील किरण मांडगे यांच्यासह पारनेर पंचायत समितीचे कृषी अधिकारी बाळीबा उघडे, तालुका कृषी अधिकारी विलास गायकवाड यांचा समावेश आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post