तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष बाळासाहेब पवार यांचे निधन

तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष बाळासाहेब पवार यांचे निधन श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष व येळपणे गावचे सरपंच बाळासाहेब जयसिंगराव पवार (वय 45) यांचे रविवारी रात्री पुण्यात कोरोनाने निधन झाले. त्यांचे मागे आई,वडील, पत्नी,  एक मुलगा,  एक मुलगी असा परिवार आहे.बाळासाहेब पवार यांनी कुस्ती क्षेत्रात अनेक मल्ल घडविण्याचे काम केले. स्व. आण्णा पाटील पवार  यांच्यानंतर येळपणे गावात कुस्तीचा खेळ जिवंत ठेवण्याचे काम केले आहे. त्यांच्यावर पुणे येथील एका रुग्णालयात उपचार करण्यात आले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post