शिवसेनेत मोठं राजकारण...भाकरे यांनी महापौरपदाच्या शर्यतीतून माघार

 


शिवसेनेत मोठं राजकारण...भाकरे यांनी महापौरपदाच्या शर्यतीतून माघारनगर : नगरच्या महापौरपदाची निवडणूक जवळ आली असून शिवसेनेतील एका इच्छुकाने उमेदवारी नको असे पक्षश्रेष्ठींना कळवले आहे. शिवसेनेकडून महापौरपदासाठी रोहिणी शेंडगे व रिता भाकरे हे महापौरपदासाठी इच्छुक असल्याचे सांगण्यात येत होतं. त्यानुसार दोघांनीही वरिष्ठांकडे उमेदवारी मिळण्यासाठी पाठपुरावा सुरु केला होता. मात्र आता रिता भाकरे यांनी महापौरपदासाठी उत्सुक नसल्याचे जाहीर केले आहे. याबाबत त्यांनी पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. हे पत्र सोशल मिडियातही व्हायरल झाले आहे. उमेदवारीच्या स्पर्धेतून बिनशर्त माघार घेत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. भाकरे यांनी माघार घेतल्याने शेंडगे यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे. भाकरे हे स्व.अनिल राठोड यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post