हृदयद्रावक... मासेमारीच्या नादात तिघे भावंड बंधार्यात वाहून गेली


हृदयद्रावक... मासेमारीच्या नादात तिघे भावंड बंधार्यात वाहून गेली सांगली : आटपाडी तालुक्यात घानंद  गावात तीन भावंडं साखळी बंधार्याच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडलीय. यात दोन सख्खे भाऊ तर एक चुलत भाऊ आहे. विशेष म्हणजे ही तीनही भावंडं ओढ्यावर कुत्रं धुण्यासाठी आणि मासे पकडण्यासाठी गेली होती. त्यातच ती वाहून गेली 

काळीज पिळवटून टाकणाऱ्या ह्या घटनेत कुत्रंही वाहून गेलं. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह सापडला आहे. तीनही भावंडांचा मात्र अजूनही शोध सुरु आहे. रात्री उशिरापर्यंत ही शोध मोहिम सुरु होती पण फार काही हाताला लागलं नाही. आज पुन्हा सकाळी शोध मोहिम सुरु झाली असून लवकरात लवकर तीनही भावंडं सापडावीत म्हणून प्रार्थना केली जातेय. आनंदा लक्ष्मण व्हनमाने, विजय लक्ष्मण व्हनमाने हे दोन सख्खी भावंडं असून त्यांचं प्रत्येकी वय 14 आणि 17 वर्षे आहे. तर वैभव लहू व्हनमाने हा 14 वर्षांचा असून तो चुलत भाऊ आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post