अडीच अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपद फडणवीसांना आजही मान्य

 अडीच अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला देवेंद्र फडणवीस यांना अजुनही मान्य, उद्धव ठाकरे यांनी विचार करावामुंबई : राज्यात विरोधी पक्षाकडून सतत सत्ताबदलाच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असतात. यात आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले  यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे. नागपुरात बोलताना ते म्हणाले की, अजूनही काही बिघडलेले नाही. अडीच अडीच वर्षाचे मुख्यमंत्रीपद आजही होऊ शकतं. आमची इच्छा आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी  विचार करावा, असं रामदास आठवलेंनी म्हटलं आहे. हे फडणवीसांना मान्य आहे, असंही ते म्हणाले.


यावेळी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, अजित पवार म्हणतात की कोण लाल आहे जो हे सरकार पाडून दाखवेल, तर मी म्हणतो तो लाल अजित पवारच आहेत, असा टोलाही आठवले यांनी लगावला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post