'अगस्ती'कारखान्याच्या सर्व संचालकांनी दिले राजीनामे, ज्येष्ठ नेते पिचड म्हणाले....

 

'अगस्ती'कारखान्याच्या सर्व संचालकांनी दिले राजीनामे नगर: सततच्या आरोपांनी त्रस्त झालेल्या अगस्ती कारखान्याच्या सर्व संचालकांनी आपले संचालक पदाचे राजीनामे आज कारखान्याचे संस्थापक चेअरमन तथा माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचेकडे सुपूर्द केले.

अगस्ती कारखाना कार्यस्थळावर संचालक मंडळाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पिचड म्हणाले, 'अगस्ती सहकारी साखर कारखाना मी हयात असेपर्यंत मोडू देणार नाही, ज्यांच्यात धमक असेल 'त्या' वीरांनी समोर यावे आणि जनताच आमच्या बाजूने कौल देईल' असा ठाम विश्वास व्यक्त करत, 'आपण ही या पदावर राहण्यास उत्सुक नाही' असा टोला विरोधकांना लगावला. यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन सीताराम पाटील गायकर यांचेसह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post