नगर शहरातील 'हे' व्यापारी सायंकाळी ६ पर्यंतच दुकाने खुली ठेवणार

 

नगर शहरातील व्यापारी सायंकाळी ६ पर्यंतच दुकाने खुली ठेवणार



नगर: करोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी करोनाचे सावट अजून कायम आहे. नगर शहरात निर्बंध पूर्ण हटले असले तरी लोकांची काळजी म्हणून शहरातील आडते बाजार, डाळ मंडई, जुनादाणडब्रा, तपकीर गल्ली, तापीदासगल्ली, वंजार गल्ली, पिंजर गल्ली, सरदार पटेल रोड वगैरे परिसरातील व्यापारी बंधूंनी स्वयंस्फूर्तीने सोमवार दिनांक १४/०६/२०२१ पासून संध्याकाळी सहा वाजता दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे, अशी माहिती अहमदनगर होलसेल पल्सेस, फ्लोवर्स & राईस मर्चंट असोसिएशनचे संतोष बोरा यांनी दिली.

  आपल्या स्वतःच्या, माथाडी कामगारांच्या, दुकानातील काम करणाऱ्या माणसांचा,आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकांच्या वगैरे सर्व लोकांच्या तसेच आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा आरोग्याच्या दृष्टीने सदर चा निर्णय स्वागतार्ह आहे.पाच/दहा व्यापारी सदरचा निर्णय पाळणार नाही म्हणून  विचलित न होता आपण आपल्या निर्णयावर ठाम राहावे. आपल्या नशिबावर विश्वास ठेवून आपल्या निर्णयावर ठाम राहुन आपल्या आरोग्याची काळजी घेऊन व्यापारी एकतेची एकजूट दाखवावी असे आवाहन बोरा यांनी केले आहे.

मार्केट यार्ड मधील आपल्या बऱ्याचशा व्यापाऱ्यांनी सदरचा निर्णय तीन दिवसापासून अंमलात आणलेला आहे.



0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post