देशात 75 दिवसांनी सर्वात कमी कोरोनाबाधितांची नोंद

देशात 75 दिवसांनी सर्वात कमी कोरोनाबाधितांची नोंददेशात 75 दिवसांनी सर्वात कमी  देशात 75 दिवसांनी सर्वात कमी दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. देशात गेल्या 24 तासांत 60 हजार 471 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर 2726 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सुरुच आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत घट होत असली तर मृतांचा आकडा धडकी भरवणारा आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 60 हजार 471 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्याता आली आहे. तर देशात 2726 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, देशात तब्बल 75 दिवसांनी एका दिवसात एवढ्या कमी रुग्णसंख्येची नोंद करण्यात आली आहे. तसेच गेल्या 24 तासांत एक लाख 17 हजार 525 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जाणून घेऊया देशातील कोरोना स्थिती...

देशातील आजची कोरोना स्थिती : एकूण कोरोना रुग्ण : दोन कोटी 95 लाख 70 हजार 471

एकूण कोरोनामुक्त रुग्ण : दोन कोटी 82 लाख 80 हजार 472 

एकूण सक्रिय रुग्ण : 9 लाख 13 हजार 368

एकूण मृत्यू : 3 लाख 77 हजार 31

आतापर्यंतची एकूण लसीकरणाची आकडेवारी : 25 कोटी 90 लाख 44 हजार 72 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post