मला 35 वर्षे राजयोग आहे, विरोधकांनी चिंता करू नये

मला 35 वर्षे राजयोग आहे, विरोधकांनी चिंता करू नये - आमदार निलेश लंकेनगर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके स्वतःचा राजयोग सांगत विरोधकांना टोला मारला आहे. एका उद्घाटनप्रसंगी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

मला 35 वर्षे राजयोग असल्याचं निलेश लंके म्हणालेत. एवढंच काय तर माझ्या आरोग्याचा विचार करणाऱ्यांनी चिंता करु नये, असं म्हणत त्यांना विरोधकांना फटकारलं आहे. कोरोना महामारीच्या संकटात अनेकांचे संसार उद्धवस्त झाले. तरी काही महाभागांनी संकटात मदत करण्याऐवजी लोकांना त्रास दिला. त्यामुळे गोरगरिबांची लूट करुन त्यांना त्रास देणाऱ्यांचा परमेश्वर कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत त्यांना विरोधकांना टोला मारला आह. वडगाव आमली येथे विविध विकासकामांचं उद्घाटन निलेश लंके यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमाच्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.  तालुक्यातील एकही गाव विकासापासून वंचित राहणार नसल्याचं सांगायलाही आमदार सांगायला विसरले नाहीत. यावेळी संभाजी रोहकले, सरपंच अमोल पवार, अॅड. राहुल झावरे, बापू शिर्के, श्रीकांत चोरे, संदीप रोहकले, गोवर्धन रोहकले, सूरज भुजबळ, प्रमोद गोडसे, भाऊसाहेब पटेकर, साहेबराव पवार, नवनाथ जाधव, नवनाथ ढोणे आदींसह मोठ्या संखेने ग्रामस्थ उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post