दिलासादायक बातमी देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये मोठी घट

 देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये मोठी घट, 81 दिवसांनी दिलासादायक बातमीनवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत   चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या 81 दिवसात पहिल्यांदाच नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 60 हजारांच्या खाली गेला. कालच्या दिवसात 58 हजार 419 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 1 हजार 576 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत घट झाल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे.


देशातील कोरोना रुग्ण आकडेवारीदेशात 24 तासात नवे रुग्ण – 58,419देशात 24 तासात डिस्चार्ज – 87,619देशात 24 तासात मृत्यू – 1576एकूण रूग्ण –  2,98,81,965एकूण डिस्चार्ज – 2,87,66,009एकूण मृत्यू – 3,86,713एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 7,29,243आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 27,66,93,572

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post