देशातील कोरोनाची लाट ओसरतेय

देशातील कोरोनाची लाट ओसरतेय; गेल्या 24 तासांत 62 हजार 224 नव्या रुग्णांची नोंद देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. दरम्यान, देशातील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु, मृतांच्या आकड्यात फारशी घट झालेली नाही. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 62 हजार 224 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 2 हजार 542 रुग्णांचा मृत्यू झाला आहे एकूण कोरोना रुग्ण : दोन कोटी 96 लाख 33 हजार 105

एकूण कोरोनामुक्त रुग्ण : दोन कोटी 83 लाख 88 हजार 100 

एकूण सक्रिय रुग्ण : 8 लाख 65 हजार 432

एकूण मृत्यू : 3 लाख 79 हजार 573

आतापर्यंतची एकूण लसीकरणाची आकडेवारी : 26 कोटी 19 लाख 72 हजार 14

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post