सकारात्मक.... जिल्ह्यात रूग्ण बरे होण्याचे चांगले प्रमाण कायम

 दिनांक ३ जून, २०२१

आज १७९४ रूग्णांना डिस्चार्ज तर  नव्या १३२६ बाधितांची रुग्ण संख्येत भर

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.५३ टक्के
अहमदनगर: जिल्ह्यात आज १७९४ रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ५३ हजार ५९५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.५३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १३२६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ८ हजार ५२० इतकी झाली आहे.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २६८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ६८६ आणि अँटीजेन चाचणीत ३७२ रुग्ण बाधीत आढळले.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०२, अकोले ४५, जामखेड ५५, कर्जत ०२, कोपरगाव १९, नगर ग्रामीण २४, पारनेर ३१, पाथर्डी ०३, राहता ०२, राहुरी ०१, संगमनेर ३८, शेवगाव २८, श्रीगोंदा ०९, श्रीरामपूर ०१, कॅंटोन्मेंट बोर्ड ०३, मिलिटरी हॉस्पिटल ०२ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.


खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ५३, अकोले ३२, जामखेड ५६, कर्जत ३२, कोपरगाव २३, नगर ग्रा.६७,  नेवासा ६७,  पारनेर ५४, पाथर्डी ३९, राहाता ३०,  राहुरी ३२, संगमनेर ७०, शेवगाव ४३, श्रीगोंदा ४३, श्रीरामपूर ३३, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ आणि इतर जिल्हा ०९ आणि इतर राज्य ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.


अँटीजेन चाचणीत आज ३७२ जण बाधित आढळुन आले. मनपा १३, अकोले २३,  जामखेड १६, कर्जत २३, कोपरगाव २२, नगर ग्रा. ३२, नेवासा १०, पारनेर ३१, पाथर्डी ४५,  राहाता १६, राहुरी २५, संगमनेर २८, शेवगाव २०, श्रीगोंदा ५१ आणि  श्रीरामपूर १७ अशा रुग्णांचा समावेश आहे.


दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये

मनपा १११, अकोले १२२, जामखेड १५४, कर्जत १६१,  कोपरगाव १२१, नगर ग्रामीण ८८, नेवासा १८६, पारनेर ८८, पाथर्डी ८६, राहाता ७८, राहुरी १२६, संगमनेर १२७,  शेवगाव १६५,  श्रीगोंदा ७१,  श्रीरामपूर ९३, कॅन्टोन्मेंट ०३ आणि इतर जिल्हा १४ अशा रुग्णांचा समावेश आहे.


बरे झालेली रुग्ण संख्या:२,५३,५९५


उपचार सुरू असलेले रूग्ण:८५२०


मृत्यू:३३५६


एकूण रूग्ण संख्या:२,६५,४७१


(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)


घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा


प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा


स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या


अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post