विवाहीतेकडे लग्नाची मागणी करीत तिच्या मुलाला पळवले, 12 तासात आरोपी जेरबंद

 प्रेमसंबंधातून विवाहीतेकडे लग्नाची मागणी करीत तिच्या मुलाला पळवले, 12 तासात आरोपी जेरबंदनगर : विवाहित महिलेशी असलेल्या प्रेमसंबंधातून तिला लग्नाचा आग्रह धरत तिच्या 6 वर्षाच्या मुलाचे अपहरण करणार्‍या आरोपीला श्रीगोंदा पोलिसांनी बारा तासात अटक केली आहे. त्याने औरंगाबाद येथून या मुलाला पळवले होते. सागर आळेकर (रा.श्रीगोंदा) असे या आरोपीचे नाव आहे. आरोपीचे औरंगाबाद येथील एका विवाहितेशी प्रेमसंबंध होते.  विवाहितेने लग्न करावे म्हणून आरोपी दबाव आणत होता. यासाठी त्याने सदर महिलेच्या मुलाला पळवून नेले. याबत फिर्यादीच्या नातेवाईकांनी सदर मुलाला आरोपी गाडीत घेवून श्रीगोंद्याकडे येत असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी नगर दौंड महामार्गावर पारगाव फाटा येथे नाकाबंदी करून आरोपीला अपहरण केलेल्या मुलासह ताब्यात घेतले. यानंतर मुलाला त्याच्या आईवडीलांच्या ताब्यात देण्यात आले. तसेच आरोपीलाही औरंगाबाद पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक ढिकले, सपोनि दिलीप तेजनकर, सफौ रमेश जाधव, अंकुश ढवळे, प्रकाश मांडगे, किरण बोराडे, दादा टाके, गोकुळ इंगवले यांच्या पथकाने ही कामगिरी केली.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post