महेंद्रनाथ महाराज उर्फ कैलास तात्या झोंड यांचे निधन

  महेंद्रनाथ महाराज उर्फ कैलास तात्या झोंड यांचे निधननगर तालुक्यातील वाळकी येथील नाथपीठाचे प्रमुख नाथयोगी महेंद्रनाथ महाराज उर्फ कैलास तात्या झोंड यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले .आठवडयापासून त्यांच्यावर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते . मंगळवारी त्यांची प्राणज्योत मावळली .

        वाळकीतील राममंदिराचा जिर्णोधार करून येथे नाथपीठाची स्थापना कली . कुटुंबाची कुठलीही पर्वा न करता त्यांनी दीन , दुबळ्यांची आयुष्यभर निस्वार्थीपणे समाजसेवा केली . महेंद्रनाथजी यांनी आयुष्यभर अध्यात्मिक क्षेत्रात मोठे योगदान दिले .भरकटलेल्या तरुणांना योग्य मार्ग दाखवत त्यांचे आयुष्य सुखमय केले . येथील रामजन्म सोहळा व गुरुपौर्णिमा त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाळी सारखाच साजरा होत . हजारो भक्तांना त्यांनी नाथपंथाची दीक्षा दिली . वाळकी सह राज्यभरात त्यांचे हजारो शिष्यगण आहेत . नाथभक्त त्यांना आपले दैवत मानत . त्यांच्या जाण्याने नाथभक्तांचा आधार हरपला . त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले , सुना , नातवंडे असा परिवार आहे . त्यांच्या निधनाने वाळकी सह परिसारातून हळहळ व्यक्त होत आहे 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post