माणिकराव झेंडें यांचे निधनकेडगाव : अहमदनगर जिल्हा सायकल संघटनेचे अध्यक्ष माणिकराव झेंडें यांचे नुकतेच निधन झाले . ते ८७ वर्षांचे होते .नगर मध्ये सायकल संघटना स्थापन करून अनेक राष्ट्रीय स्तरावरील सायकलपटू तयार करण्यात त्यांचे मोठे योगदान होते . राष्ट्रीय सायकल स्पर्धेत नगरचा दबदबा निर्माण करण्यात त्यांनी आयुष्य खर्चि घातले . त्यांनी स्वतः अनेक राष्ट्रीय स्तरावरील सायकल स्पर्धा जिंकल्या . त्यांना जिवनगौरव सह अनेक मानाचे पुरस्कार मिळाले . नगरमध्ये यशस्वी उद्योजक म्हणुन ही त्यांची ओळख होती . शिवछत्रपती पुरस्कार विजेते सायकलपटू सतीश झेंडे , उद्योजक सुहास झेंडें यांचे ते वडिल होत . त्यांच्या मागे दोन मुले , दोन मुली सुना , नातवंडे असा मोठा परिवार आहे .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post