ही वेळ लोकांना आधार देण्याची, प्रसिध्दी मिळवून स्वत:ची वाहवा करून घेण्याची नाही

 ही वेळ लोकांना आधार देण्याची, प्रसिध्दी मिळवून स्वत:ची वाहवा करून घेण्याची नाही : सुजित झावरे पाटीलनगर : करोनाच्या संकटात सर्वसामान्यांना वेळेत मदत मिळणे अत्यावश्यक आहे. झटून काम करणे अतिशय महत्त्वाचे असून प्रसिध्दी, स्टंटबाजीची ही वेळ नव्हे, असे मत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी व्यक्त केले आहे. करोना काळात झावरे यांनीही पारनेर तालुक्यात अद्ययावत कोविड केअर सेंटर सुरु करून रूग्णांना आधार देण्याचे काम चालवले आहे. टाकळी ढोकेश्वर येथे स्व.माजी आ.वसंतराव झावरे पाटील कोविड केअर सेंटर कार्यान्वीत असून याठिकाणी आतापर्यंत शेकडो रूग्ण ठणठणीत बरे होवून घरी परतले आहेत. आताही येथे दीडशेहून अधिक रूग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे येथील कोविड सेंटरमध्ये रूग्ण अत्यवस्थ झाल्यास त्यांना नगरमध्ये खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे रूग्णांना येथे मोठा आधार मिळत आहे.

रूग्णसेवेचे हे काम झावरे व त्यांचे सहकारी व्रत म्हणून करीत आहे. कोविड सेंटरबद्दल बोलताना झावरे म्हणाले की, करोना महामारीने सर्वच जनता त्रस्त झाली आहे. लॉकडाऊनमुळे रोजगाराची मोठा समस्या निर्माण झाली आहे. त्यातच करोनाबाधितांचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येक घटकाला मदत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. हे काम करताना राजकीय अभिनिवेष जाणीवपूर्वक बाजूला ठेवला आहे. माणसं जगवणं व त्यांना आधार देणे हे महत्त्वाचे आहे. प्रसिध्दी मिळवण्याची व कामासाठी कोणाकडून वाहवा मिळवण्याची धडपड करण्याची ही वेळ नसल्याचे त्यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post