विडी कामगारांच्या खात्यावर 1 हजार रुपये जमा होणार

 विडी कामगारांच्या खात्यावर 1 हजार रुपये जमा होणार

आ.संग्राम जगताप, हमाल पंचातय जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, सहाय्यक कामगार आयुक्तांसह विडी कामगार युनियनच्या प्रयत्नांना यश


नगर - गेल्या दीड वर्षापासून कडक निर्बंधामुळे विडी कारखाने गेल्या कित्येक महिनांपासून बंद आहेत. त्यामुळे या विडी कामगारांच्या हाताला काही काम नाही. त्यांनी आपल्या कुटूंबियांच्या उदरनिर्वाहासाठी शासनाकडे आर्थिक मदतीची आमदार संग्राम जगताप, हमाल पंचायतीचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले व सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रकांत राऊत मागणी केली आहे. त्याचबरोबर हे जे विडी कामगार ज्या कंपनीकडे  काम करतात त्या कंपन्यांनी कामगारांचे दायित्व घेऊन त्यांना मदत करावी, यासाठी प्रयत्न केेले. त्यानुसार विडी कंपन्यांनी विडी कामगारांना एक हजार रुपयांची मदत देण्याची  प्रक्रिया सुरु केली आहे. 
कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर लॉकडाऊनमध्ये विडी उद्योग  बंद असल्याने विडी कामगारांवर उपासमारीची वेळी आली आहे. या कामगारांना आर्थिक मदत मिळावी यासाठी लालबावटा विडी कामगार युनियम सह विविध कामगार संघटनांनी शासनाकडे तसेच विडी कंपन्यांकडे निवेदने, आंदोलने, उपोषणाद्वारे मागणी केली होती. तसेच याबाबत आ.संग्राम जगताप व हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले यांनाही निवेदन देण्यात आले होते.  आ.संग्राम जगताप, हमाल पंचातय जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, युनियनचे पदाधिकारी यांनी विडी कंपन्यांशी चर्चा करुन कामगारांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी प्रयत्न केले व त्यास यश येऊन विडी कामगारांच्याा खात्यावर एक हजार रुपये भरण्यास सुरुवात झाली आहे.
याबाबत आ.संग्राम जगताप म्हणाले, कोरोनामुळे सर्वांवरच मोठे  संकट ओढवले आहे.  बंदमुळे हातावर पोट असणार्‍यांची आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे. त्यात  विडी  कामगारांनाचेही काम बंद असल्याने त्यांनी आर्थिक मदती मिळावी, यासाठी आपण पालकमंत्री, कामगार मंत्री व संबंधित विभागाकडे पाठपुरावा करुन सत्यपरिस्थिती मांडली आहे. त्याचबरोबर विडी कंपन्यांनीही आपल्या कामगारांना मदतीचा हात द्यावा, अशी सूचना मांडली.कंपन्यांनीही सकारात्मक  प्रतिसाद देत विडी कामगारांना आर्थिक मदत देण्याचे मान्य केले. आज प्रत्येक घटक विविध समस्यांना तोंड देत आहे. आरोग्य बरोबरच बंदमुळे आर्थिक समस्यांही निर्माण झाली अशा घटकांना शासनाच्यावतीने लाभ मिळवून देण्यासाठी आपले  प्रयत्न सुरु आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post