पश्चिम बंगालमध्ये दीदीच ‘वाघिण’...भाजपचे मनसुबे हवेतच...

 

पश्चिम बंगालमध्ये दीदीच ‘वाघिण’...भाजपचे मनसुबे हवेतच...भाजपाने पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींनाच लक्ष्य केले होते. मात्र, त्याच्या उलटा खेळ झाला असून तृणमूल संपण्याऐवजी डावे आणि काँग्रेसच संपली आहे. कलांनुसार तृणमूलला 202 जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे. तर भाजपाला 87 जागांवर आघाडी दिसत आहे. मात्र, डाव्यांच्या पारड्यात भोपळा पडताना दिसत आहे.

2016 च्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला 210 जागा मिळाल्या होत्या. डाव्यांच्या आघाडीला 77 आणि भाजपाला 3 जागा मिळाल्या होत्या. तसेच अन्यला 4 जागा मिळाल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत भाजपाने अब की बार 200 पार म्हणत पश्चिम बंगालमध्ये जोरदार ताकद लावली होती. पश्चिम बंगालसाठी भाजपाने केरळच्या निवडणुकीकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, भाजपाला ममता बॅनर्जींच्या तृणमूलला काही संपविणे जमलेले नाहीय. उलट भाजपाने डाव्यांना आणि काँग्रेस आघाडीला संपविले आहे. डाव्यांच्या पारड्यात 77 वरून थेट शून्य पडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post